ज्ञानदीप वधू वर सूचक केंद्र

आज आम्हास सांगावयास अत्यंत आनंद वाटतो हे की, १८ वर्षांपूर्वी आमच्या संस्थेने मूहूर्तमेढ रोवून वधू-वर सूचक मंडळाच्या वेबसाईटचा कार्यप्रारंभ केला. प्रत्येक आई-वडीलांना आपलं मूल फक्त मोठं व्हावस वाटत असं नाही तर ते संस्कारित असावं, बौद्धीक दृष्ट्या परिपक्व (मॅच्युअर्ड) असावं असंही वाटत असतं. आमचं हे संस्थारुपी अपत्यही याला निश्चितच अपवाद नाही.

मराठा समाज संपुर्ण जगभर पसरलेला आहे त्यामुळे लग्न जमवणे हल्ली कठीण समस्या होऊन बसली आहे. ४२ वर्षे पुर्ण केलेल्या या संस्थेमार्फ़त आत्ता पर्य़ंत १२,००० पेक्षा जास्त विवाह जमवले गेले आहेत. २००७ मध्ये परिपूर्ण जोडीदार शोधासाठी ही वेबसाइट आम्ही विकसित केली.

आमच्या कडे वधू आणि वर यांची भरपूर ऑनलाईन स्थळं आहेत. त्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर्स, सीए, सीएस, व्यवसाय वर्ग आणि इतर प्रोफाइल अशा अनेक प्रकारचा सर्वात मोठा डेटाबेस आहे. आपण ऑनलाईन फ़ॉर्म भरून किंवा आमच्या पत्त्यावर कार्यालयात येऊन आपले नाव नोंदवू शकता आणि घरबसल्या मनपसंद जावई किंवा सून शोधू शकता.

समाजातील प्रत्येक घटक हा समाजाचे काहीतरी देणं लागतो आणि म्हणुनच राष्ट्राला एक निकोप सुसंस्कृत कुटुंब देण्याचा आमचा मुख्य हेतु आहे. मला समाज काय देतो त्याही पेक्षा मी समाजाला काय देतो हे अतिशय महत्वाचे आहे.

धन्यवाद !